नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२५: हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सून रेंगाळणार असल्याचे ऑक्टोबरच्या प्रारंभीच जाहीर केले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. येणाऱ्या तीन दिवसांत पुढील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात २० ऑक्टोबरपर्यंत विविध भागांत पाऊस होईल. त्यानंतर देशातील इतर भागांसह महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी पडण्याची दाट चिन्हे आहेत. यंदा नियोजित वेळेच्या एक दिवस उशिरा म्हणजे १६ ऑक्टोबरला नैऋत्य मान्सून देशाबाहेर गेला, त्याच वेळी, ईशान्य मान्सून दक्षिण भारतात दाखल झाला. पुढील अडीच महिने पूर्व किनाऱ्यावर पावसाचा एक नवीन टप्पा सुरू राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
👉 शुक्रवारी: बुलढाणा, धुळे, नाशिक घाटमाथा, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली.
👉 शनिवार सह्याद्री घाटमाथा, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव.
👉 रविवार: नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली.
![]()
