ॲड.राहुल ढिकले यांचे चांगले काम हीच विजयाची पावती : बाळासाहेब सानप

नाशिक: ॲड.राहुल ढिकले यांनी गेल्या पाच वर्षात केलेल काम तुमच्या समोर आहे अन् मीही केलेलं काम केलेल काम तुमच्या समोर आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने ढिकले विजयी होणार हे निश्चित आहे असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

पूर्व मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. राहुल उत्तमराव ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे जेलरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडले.यावेळी महायुतीचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व इतर घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेलरोड येथील विविध संघटनांच्या तसेच पक्षांच्या मान्यवरांनी राहुल ढिकले यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार बाळासाहेब सानप होते.

हे ही वाचा:  नाशिक: स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्या; एकाचा मृत्यू

व्यासपीठावर  विजय साने, मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, प्रकाश लोंढे, संजय भालेराव, रामबाबा पठारे, भारत निकम, समीर शेख,संतोष कांबळे, शशीभाई उन्हवने, माजी नगरसेवक दिनकर आढाव,अनिता सतभाई, सूर्यकांत लवटे, उध्दव निमसे, विशाल संगमनेरे, शरद मोरे सर, रमेश धोंगडे, राजेश आढाव, संभाजी मोरूजकर, पंडित आवारे, शिवाजी भोर आदी मान्यवर उपस्थित होते.राहुल ढिकले यांचे पूर्व मतदार संघात अनेक विकास कामांचा आढावा मान्यवरांनी मतदारांसमोर मांडला.

सानप म्हणाले की, आमच्या दोघांचं काम तुमच्या समोर आहे. गेल्या वेळी आम्ही दोघे एकमेकाच्या विरोधात लढलो पण आज दोघेही एकत्र आहोत. त्यामुळे ढिकले यांनी चांगल काम केल्याने त्यांना पुन्हा संधी दिली पाहिजे. मी गेले तीस वर्ष विविध पद भूषवली आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता कोणाबरोबर आहे हेही मला समजते. आम्ही दोघे वरिष्ठांना भेटायला मुंबईला गेल्यानंतर आम्ही त्यांना एकच सांगितले की दोघांपैकी ज्याला उमेदवारी द्याल त्याला निवडून आणण्याचं काम करू. माझी तब्येत साथ देत नसल्याने मी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. आता राहुल ढिकले हे उत्तर महाराष्ट्रातून एक नंबर ने विजयी होणार यात शंका नाही.

हे ही वाचा:  नाशिक: बनावट शासकीय नियुक्तीपत्र देत गंडा; भामट्याकडून 8 लाखांची फसवणूक

याप्रसंगी मंगेश मोरे, सचिन हांडगे, राहुल बेरड, आप्पा नाठे, संदीप पाटील, प्रविण पवार, सचिन सिसोदे, दिनेश नाचण, सुरेखा निमसे, कुंदा सहाने, राहुल गायकवाड, शंतनु निसाळ, कृष्णा बोराडे, अमोल बोराडे, आदित्य ढिकले, सुयश पागेरे, स्वप्निल कातोरे, विजय भिशे, मतेश जडगुले, सागर लखन, योगेश रसाळ, कपिल खर्जुल, यतिश ठाकूर, महेश पवार, सुमित चव्हाणके, सागर कड, राहुल कोथमिरे, योगेश कपिले, दिनेश अहिरे, दिलीप आढाव, शुभम पाटील, गणेश गडाख, वैभव देशमाने, सुनिल धोंगडे, अविनाश यादव, सागर कड, दीपक आढाव, प्रशांत कळमकर, शैलेंद्र सिंग, पंकज टिळे, विनायक काळे, अजिंक्य माळवे, अजिंक्य ढिकले, केतन बोराडे, बाळा कदम, कृष्णा क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790