नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंचा विजय

नाशिक। दि. २२ जून २०२६: नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षांना छेद देणारा निकाल समोर आला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. तर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

या निवडणुकीकडे नाशिकसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. उमेदवारीच्या प्रक्रियेदरम्यान गोकुळ गिते आणि गणेश गिते हे दोघेही मैदानात होते. मात्र, गणेश गिते यांनी माघार घेतल्यानंतर गोकुळ गिते यांची उमेदवारी कायम राहिली आणि निवडणूक अधिकच चर्चेचा विषय ठरली.

मतमोजणीनंतर गोकुळ गिते यांनी निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला, तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे महायुतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' विविध भागांतील वाहतूक मार्गात आज (दि. २६) महत्वाचे बदल

निकालानंतर नरेंद्र दराडे यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याशी विश्वासघात झाल्याचा आरोप केला. दरम्यान, त्यांचे पुत्र कुणाल दराडे यांनीही प्रतिक्रिया देताना, “आमचा विश्वासघात झाला असून केसाने गळा कापला” असे म्हंटले.

या निकालामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून आगामी काळात त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790