त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

नाशिक। दि. ९ एप्रिल २०२६: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आणि पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना उत्तम, दर्जेदार सुविधा मिळतील, असे नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले.

मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली काल दुपारी त्रंबकेश्वर नगर परिषदेत कुंभमेळा व विविध विभागांच्या कामांचा आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष मंजू वारुंगसे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

मंत्री भुसे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी येत्या ऑक्टोबरमध्ये ध्वज स्थापना होणार आहे . त्या दृष्टीने प्रस्तावित कामांना वेग देणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते विकास, वीज केबल्स भूमिगत करणे, तसेच शहर सुशोभीकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, कुंभमेळ्याच्या कामामुळे विस्थापित होणाऱ्या व्यापाऱ्यांचे व दुकानदारांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

आरोग्य विभागाकडून कुंभमेळासाठी 1 हजार 300 बेडचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दर्शन पथ मार्गावरील शासकीय रुग्णालय देवस्थान ट्रस्टच्या कायमस्वरूपी जागेत उभारण्यात यावे. सुरक्षेच्या दृष्टीने कुंभमेळा काळात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. शहरासाठी नवीन जिल्हा परिषद शाळेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790