नाशिक: पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी): पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूम शी जोडणार, केंद्र व राज्य  शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या. राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या 14 सेवा  आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री  इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक,पर्यटन  विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाकडून अनुदानित  प्रकल्पामध्ये  नाशिक येथील राम – काल पथ विकास, सिंधुदुर्गातील मालवण येथील  पाण्याखालील  सागरी पर्यटनाचा अनुभव, स्वदेश दर्शन अंतर्गत आंबेगाव पुणे येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास, अजंठा वेरूळ पर्यटन विकास ही कामे सुरू करून त्याला गती देण्यात येणार आहे. स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटक आकर्षणासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे या सर्व कामांच्या निविदा लवकरात लवकर पूर्ण करून  ही कामे लवकर सुरू करावीत.

हे ही वाचा:  राज्यात ढगाळ वातावरणामुळे गारठा कमी, पण 'या' भागांत थंडीचा कडाका वाढणार

राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा-पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देणे, शिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारणे, पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक या सर्व कामांची सल्लागार नेमून ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:  आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या स्वतःच्या इमारती बांधण्याचे नियोजन करावे- डॉ. उईके

पर्यटन विभागाने 31 मार्च पूर्वी   उद्योग प्रमाणपत्र, कृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, कॅरव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र, आई महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणी, पर्यटन व्हीलाची नोंदणी, पर्यटन अपार्टमेंटचे नोंदणी प्रमाणपत्र, होम स्टेच नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:  नाशिक: 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

राज्यातील पर्यटन पोहचणार आंतरराष्ट्रीय पातळीवर:
आंतरराष्ट्रीय पातळीवरती राज्यातील पर्यटन पोहोचवण्यासाठी विविध फेस्टिवल तसेच रोड शोसाठी महाराष्ट्र शासन सहभागी होणार आहे. माद्रिद येथे होणारा फितूर आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर, नाशिक येथील ग्लंम्पिंग फेस्टिवल, दिल्ली येथे होणारा भारत पर्व, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हिंदवी स्वराज्य महोत्सव, बर्लिन येथे आयटीबी अंतर्गत, महाबळेश्वर येथे होणारे टुरिझम कॉनक्लेव मध्ये पर्यटन विभाग सहभागी होणार आहे याबाबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सादरीकरण केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790