नाशिक: 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

नाशिक (प्रतिनिधी): वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे आवश्यक आहे.

त्यानुसार परिवहन विभागाच्या 23 डिसेंबर 2024 रोजी परिपत्रकानुसार जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांच्या वाहनधारकांनी 31 मार्च 2025 पूर्वी आपल्या वाहनाची एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

⚡ हे ही वाचा:  सोने तारण न ठेवताच वित्तीय संस्थेला आठ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात गुन्हा

वाहनांना एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी M/s. FTA HSRO solutions pvt. Ltd ही एजन्सी व https://maharashtrahsrp.com हे संकेतस्थळ निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करून सोयीप्रमाणे वेळ घेवून नंबर प्लेट बसवून घ्यावी. वाहनधारक नाशिक कार्यालयातील नोंदणी धारक जरी नसला व कामासाठी वाहन जिल्ह्यात वापरत असेल तरीही वाहनास एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी जीएसटी वगळता दुचाकी/ ट्रॅक्टर धारकांना रूपये 450, तीन चाकी वाहनांना रूपये 500 व इतर सर्व वाहनांना रूपये 745 इतके शुल्क निश्चित केले आहे.

⚡ हे ही वाचा:  त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण शेतकऱ्यांचे नुकसान न करता होणार- जलसंपदामंत्री गिरीश महाजन

वाहनवार एच.एस.आर.पी. नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे/ उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्यावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे. याबबात काही अडचण अथवा तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे तक्रार दाखल करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here