नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत निर्बंध सुकर करणे तसेच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उघडण्याबाबत काही महत्वाचे आदेश जारी केला आहे. यामध्ये शहरातील सर्व बाजारपेठा, बाजारपेठ परिसर, आणि दुकाने (मॉल आणि व्यापारी संकुल वगळून) या ठिकाणी शहर वाहतूक शाखेने P-१ आणि P-२ बाबत प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार रस्त्याला/ passage ला/ लेन ला सम तारखांना (जसे की दि.२,४,६,८,१०….) व त्या समोरील बाजूस असणारी दुकाने विषम तारखांना (जसे की दि. १,३,५,७,९…) सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडी ठेवता येतील.
तसेच सदर p-१ आणि p-२ बाबत आदेश भाजी/फळे विक्री, किरणा, औषधे विक्सरी, पिठाची गिरणी, दुध स्वस्त धान्य दुकाने, बी-बियाणे व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने यांना लागू राहणार नाही.
जाणून घ्या: सम-विषम तारखेला काय सुरु राहणार आणि काय बंद..!