जाणून घ्या: सम-विषम तारखेला काय सुरु राहणार आणि काय बंद..!

नाशिक (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गंत निर्बंध  सुकर  करणे तसेच  टप्प्याटप्प्याने  टाळेबंदी  उघडणेबाबत आदेश जारी केला आहे :

तसेच खालील आदेशांचे पालन न झाल्यास अशी  दुकाने / बाजारपेठ  बंद  करणेत येतील.

कपडयांच्या दुकानांमधील  ट्रायल  रुमचा  वापर  करण्यास मनाई,  त्याचप्रमाणे  एक्सचेंज  पॉलिसी  आणि  रिटर्न  पॉलिसीला  परवानगी  असणार  नाही.

दुकानांमध्ये  सामाजिक  अंतराच्या  निकषाची  खात्री  करण्यासाठी  दुकानदार  जबाबदार असतील  आणि  दुकानांमध्ये  जमिनीवर  फुटमार्क,  टोकन  सिस्टम,  होम  डिलीव्हरी  इत्यादी  उपायांचा वापर करावा.

लोकांनी  खरेदीसाठी  बाहेर  जातांना  चालणे/  सायकलचा  वापर  करावा  आणि  शक्य  तितक्या  जवळील/ आसपासच्या   बाजाराचा  खरेदीसाठी  वापर करावा.

प्रत्येक  दुकानदाराने तोंडाला मास्क व हातामध्ये हॅन्डग्लोज वापरावेत.

प्रत्येक ठिकाणी  दैनंदीन स्वच्छता / निर्जुतुकीकरणची  व्यवस्था करणेत यावी.

खालील बाबींवर पूर्वीप्रमाणेच प्रतिबंध कायम राहील.

केस कर्तनालय बंदच राहतील.

स्पा अथवा  सलून  ब्युटीपार्लर बंद राहतील.

शॉपिंग मॉल बंद राहील.

हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि पर्यटन पाहुणचारासंबंधिच्या सेवांवर प्रतिबंध राहील.

यामध्ये ज्या बाजारपेठा,  बाजारपेठ परीसर आणि दुकाने यांचा समावेश शहर वाहतूक शाखेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेत नसेल,  अशा  ठिकाणी  संबंधित  विभागीय अधिकारी  यांनी  स्थानिक परिस्थितीचा विचार करुन सम विषम बाबत विभागीय स्तरावर निर्णय घेतील. तसेच खालीलप्रमाणे सूचनांचे/ आदेशांचे पालन करणेकामी सूचित केले.