नाशिक: पित्यानेच सुपारी देऊन काढला एकुलत्या एक मुलाचा काटा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दारू पिऊन आई-वडील व कुटुंबीयांना त्रास देत असल्याने वडिलांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातीलचा दोघांना ७० हजारांची सुपारी देऊन मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहुल शिवाजी आव्हाड (३०) असे मृत मुलाचे नाव आहे.

मुलाची सुरू असलेली गावगुंडी, सतत मद्यपान करणे आणि घरात आई-वडिलांना होणारी मारहाण असह्य झाल्यामुळे जन्मदात्या पित्यानेच 70 हजार रुपये सुपारी देऊन त्याला संपवल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे उघडकीस आली.

सिन्नर पोलिसांनी जलद गतीने तपास करत या प्रकरणात मयत तरुणाच्या वडिलांसह आणखी दोघांना अटक केली आहे.

राहुल शिवाजी आव्हाड (३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. सतत मद्यपान करून गावात गावगुंडी करणे व घरात देखील आई-वडिलांना नेहमीच मारहाण करण्याचे प्रकार राहुल कडून सुरू होते.

त्याच्या व्यसनाला घरातले आणि गावातली मंडळी देखील वैतागलेली होती. मंगळवारी दि.२७ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पास्ते शिवारातील बंद पडलेल्या स्फोटक कंपनीच्या मीटर हाऊसमध्ये राहुल मृत अवस्थेत पडलेला असल्याचे सिन्नर पोलिसांना समजले पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली.

एका खोलीत गळा आवळून फाशी दिलेल्या अवस्थेत राहुलचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. तर जवळच दारूच्या रिकाम्या बाटल्या देखील असल्याने पोलिसांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपास करत या घटनेचे मूळ गाठण्यात यश मिळवले.

मुलाच्या वाईट प्रवृत्तीमुळे जन्मदात्या बापानेच त्याला सुपारी देऊन संपवण्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला.

शिवाजी आव्हाड यांनी गावातीलच वसंता अंबादास आव्हाड (40) व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (42) या दोघांना राहुलला ठार मारण्याची सुपारी दिली होती सोमवारी त्यांनी वसंत आव्हाड याच्या बँक खात्यावर वीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले व पन्नास हजार रुपये रोख दिले होते.

पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात वसंत आव्हाड याने दारू पिण्याच्या पाहण्याने राहुलला बंद पडलेल्या कंपनीकडे नेल्याचे निष्पन्न झाले होते. तेथे विकास देखिल होता. तिघांनी मद्यपान केल्यावर कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून राहुलचा खून केला व दोघेही पळून गेले.

वडील शिवाजी आव्हाड यांनीच मुलाच्या कुणाची कबुली दिल्यावर सिन्नर पोलिसांनी तिघांना अटक केली. उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे पुढील तपास करत आहेत.

राहुलने शनिवारी मद्यपान करून घरी आल्यावर आई-वडिलांना मारहाण केली होती. त्यावेळी त्याच्या आईला सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या शेजारच्या महिलेवर देखील हल्ला करून त्याने तिला गंभीर जखमी केले होते.

सदर महिलेच्या डोक्यात दगड घातल्याने ती कोमामध्ये आहे. या प्रकरणानंतर वडील शिवाजी अव्हाड यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दिली होती. त्याला शोधण्यासाठी गावात आलेल्या पोलिसाना बघून राहुल परागंदा झाला होता.

राहुलच्या त्रासामुळे गावात नेहमीच खाली पहावे लागत असल्याने शिवाजी आव्हाड यांनी आपल्या मित्रांना विश्वासात घेऊन त्यांनाच 70 हजार रुपये सुपारी देऊन त्याचा काटा काढण्यास सांगितले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790