नाशिकला २४ जुलै रोजी टपाल विभागातर्फे नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसचे उदघाटन

नाशिक। दि. २३ जूलै २०२६: भारतीय टपाल नाशिक विभागातर्फे नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन शुक्रवार २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती वरीष्ठ अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

डाक विभाग नागरिकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. याच अनुषंगाने जेन झी (Gen Z) यांच्या अपेक्षा, गरजा आणि सुविधा लक्षात घेत त्यांच्यासाठी डाक विभाग नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस ही संकल्पना घेऊन आली आहे. याद्वारे डाक विभागाने देशात 100 नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस कार्यान्वित केली आहेत.
भारतीय टपाल नाशिक विभागाच्या वतीने नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन शुक्रवार २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता संदीप युनिव्हर्सिटी नाशिक येथे होईल.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

या आधुनिक पोस्ट ऑफिसचे उद्घाटन नवी मुंबई क्षेत्र पनवेलच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी हस्ते होईल. संदीप युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. संदीप झा उपस्थित राहतील. या उद्घाटन सोहळ्यास विद्यार्थी, नागरिक, इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. वाणी यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790