नाशिक पोलीस आज घेणार ललित पाटीलचा ताबा; पथक मुंबईत दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): एमडी ड्रग्ज व ससून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात मागील काही महिन्यांपासून चर्चेत राहिलेल्या मुळ नाशिकचा रहिवासी असलेला संशयित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचा नाशिक पोलिसांकडून शुक्रवारी (दि.८) चौकशीसाठी ताबा घेतला जाणार आहे. यासाठी पथक मुंबईत दाखल झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

शुक्रवारी मुंबईत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यास ललितसह रोहित चौधरी, झिशान शेख, हरिशपंत या तीघांचाही ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून घेण्यात येईल. बहुचर्चित ललित पानपाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर रोजी फरार झाला होता.

हे ही वाचा:  नाशिक: 'आरटीओमध्ये नोकरी लावून देतो' सांगून 24 लाखांची फसवणूक

यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. तेव्हापासून नाशिक, पुणे आणि मुंबई पोलीस हे त्याच्या मागावर होते. तो पुण्यातून फरार झाल्यानंतर नाशकात मुक्कामी राहिला होता.

येथून त्याने २५लाखांची रोकड घेऊन पुढे पोबारा केला होता. त्याला बंगळुरूमधून पकडण्यास मुंबई पोलिसांना यश आले होते. त्याची मुंबई पोलिसांकडील कोठडी संपल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेत कसून चौकशी केली होती, ललितसह एकुण १४ जणांच्या टोळीवर पुणे पोलिस आयुक्तालयाकडून मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: स्वाधार योजनेच्या अर्जासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

ललितला मुंबई न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनाही तो गुन्ह्यात हवा असल्याने त्याचा ताबा चौकशीसाठी घेतला जाणार आहे. नाशिक पोलिसांनी प्रक्रिया पूर्ण केली असून त्याला शुक्रवारी पोलिसांकडून ताब्यात घेऊन नाशकात आणण्याची श्यक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. शिंदे गावात उभारण्यात आलेल्या एमडी पावडर व कच्चा मालाच्या गोदामाबाबत त्याच्याकडे पोलिसांकडून चौकशी केली जाऊ शकते. या गुन्ह्यात पोलिसांना संशयित संजय उर्फ बंटी काळे व समाधान कांबळे हे दोघेही हवे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक कमाल तापमान ३७.५; आगामी ३ दिवस ३ अंशाने तापमान वाढणार

नाशिक न्यायालयाकडून ताबा:
वॉरंट प्राप्तनाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडून ललितसह तीघांचा ताबा वॉरंट अमली पदार्थ- विरोधी पथकाला प्राप्त झाला आहे. पथकाकडून आता शुक्रवारी मुंबई न्यायालयात प्रकिया पुर्ण करून तेथून न्यायालयाने आदेश देताच या चौघांना ऑर्थररोड कारागृहातून पथक ताब्यात घेणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790