नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई- आग्रा महामार्गावर वाडिव-हे येथे दत्त मंदिर जवळ कारने मोटर सायकलला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहे.
दुपारी साडेचार वाजता नाशिक कडून मुंबईकडे जाणा-या मोटर सायकलला मागून येणा-या बलोनो कारने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मोटर सायकलवर प्रवास करणारे आई व मुलगा गंभीर जखमी झाले.
या अपघातात किशोर भाऊराव शिंदे, कविता भाऊराव शिंदे रा. वाळविहिर ता. ईगतपुरी हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना तात्काळ नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790