नाशिक: श्री सप्तशृंगी गड यात्रा उत्सवासाठी दर दहा मिनिटाला बस; ३२० अतिरिक्त बसेस धावणार !

नाशिक। दि. २० सप्टेंबर २०२५: येत्या सप्तशृंगी गड यात्रा उत्सवासाठी नाशिक विभागीय एस.टी. महामंडळाने विशेष बससेवेची सोय केली आहे. २१ सप्टेंबर २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत यात्रेकरूंकरिता नाशिकसह विविध ठिकाणांहून गडाकडे अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

यात्रेच्या कालावधीत एकूण ३२० अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाशिकमधून सर्वाधिक १२० बसेस सोडण्यात येणार असून प्रवाशांना दर ५ मिनीटांनी एक बस उपलब्ध असेल. यामध्ये प्रवाशांसाठी विशेष भाडे निश्चित करण्यात आले असून नाशिक ते गड साधारण बस भाडे १२५ रुपये व सुखसोयी बस भाडे १५५ रुपये तर मालेगाव ते गड साधारण ८५ व सुखसोयी बस १०५ रुपये असेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

अशा धावतील बस:
नाशिक ते सप्तशृंगी गड:
१२० बस
मालेगाव ते सप्तशृंगी गड: ८० बस
मनमाड ते सप्तशृंगी गड: २५ बस
चांदवड ते सप्तशृंगी गड: १५ बस
सटाणा ते सप्तशृंगी गड: ७० बस
नांदगाव ते सप्तशृंगी गड: १० बस

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790