
नाशिक। दि. ५ डिसेंबर २०२५: वाहतूक क्षेत्रातून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन व वायू प्रदूषण रोखण्यासाठी महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक विभागांतर्गत नाशिक- बोरिवली जाणाऱ्या 11 व येणाऱ्या 11 बस तसेच नाशिक- छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या 2 व येणाऱ्या 2 इलेक्ट्रिक वातानुकुलीत शुभारंभ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला.
हिंदु ह्रदयससम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मार्गे वेळापत्रकानुसार या बस सुरू झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गिते यांनी दिली आहे.
यावेळी विभाग नियंत्रक सचिन श्रीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, कल्याणी ढगे, आगार व्यवस्थापक दादाजी महाजन, आगार व्यवस्थापक यांत्रिक प्रतापसिंग राजपूत हे उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत नाशिक विभागांतर्गत आता नाशिक- बोरिवली व नाशिक- छत्रपती संभाजीनगर सह नाशिक-शिवाजीनगर, नाशिक- त्र्यंबकेश्वर, नाशिक- शिर्डी, नाशिक-सटाणा, नाशिक-नंदुरबार, नाशिक- कसारा विभागामार्फत सध्या 65 इलेक्ट्रिक बस प्रवासी सेवा प्रदान करीत आहेत. पर्यावरणपूरक आधुनिक प्रवासी सेवेच्या माध्यामातून प्रवाशांचा आरामदायी व सुरक्षित प्रवास होणार आहे.
असे आहे वेळापत्रक:
- नाशिक ते छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर ते नाशिक – बसची वेळ सकाळी 6:00 व सायंकाळी 18:00- या बससाठी पुर्ण तिकिट रूपये 509, अर्धे तिकिट रूपये 255 व महिला तिकिट रूपये 266 असे दर आहेत.
- नाशिक ते बोरिवली- बसची वेळ 6:00, 7:00, 8:00, 9:00, 10:00, 12:30, 13:30, 14:30, 15:30, 16:30, 17:30 असून बससाठी पुर्ण तिकिट रूपये 509, अर्धे तिकिट रूपये 255 व महिला तिकिट रूपये 266 असे दर आहेत.
- बोरिवली ते नाशिक- बसची वेळ 5:00, 7:00, 8:00, 9:00, 10:00, 11:00, 12:30, 13:30, 14:30, 15:30, 17:00 अशी आहे. बससाठी पुर्ण तिकिट रूपये 509, अर्धे तिकिट रूपये 255 व महिला तिकिट रूपये 266 असे दर आहेत.
![]()


