नाशिक शहरातील ‘या’ भागांत बुधवारी (दि. २१) वीजपुरवठा बंद राहणार

नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या पाथर्डी कक्षाच्या भागात येणाऱ्या ३३/११ केव्ही सारूळ विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच उच्चतम सेवेसाठी सारूळ उपकेंद्र येथे जास्त क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याने बुधवारी (दि. २१ मे २०२५) रोजी विद्युत पुरवठा बंद असणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: भरधाव बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक जखमी

३३/११ केव्ही सारूळ उपकेंद्र येथे बुधवारी (दि. २१) रोजी रोहित्र क्षमता वाढ करण्यासाठी जास्त क्षमतेचे नवीन रोहित्र उभारण्यात येणार असल्याने सकाळी ०७ ते रात्री १० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान ११ केव्ही एनटीसी, विजयानंद, सपट, राजूर, जेटेक्स आणि ३३ केव्ही इंदूरवाला या वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित असणार आहे. यामध्ये राजुर, पिंपळद, आंबे बहुला, रायगड नगर, सारूळ या भागाचा समावेश असणार आहे. रोहित्र क्षमतावाढ करण्याचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग- २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790