नाशिक: अनंत जायभावेकडे सापडला पावणेतीन लाखांचा MDचा साठा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात एकापाठोपाठ एक एमडीचे (मॅफेड्रॉन) टोळ्या उघडकीस आल्यानंतरही शहरात एमडीची विक्री सुरू होती. संशयितांनी दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करीत थेट पोलिसांनाच आव्हान दिले असता, त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

तर, त्यांना एमडी पुरविणाऱ्या अनंत जायभावे याच्या अटकेनंतर त्याच्याकडूनही २ लाख ७० हजारांचा ५४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या टोळीच्या एमडीचे धागेदोरे मुंबईपर्यंत जात असल्याने शहर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथक त्या दिशेने तपास करीत आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

शहर गुन्हेशाखेच्या पथकाने गेल्या आठवड्यामध्ये १ लाखांच्या २० ग्रॅम एमडीसह सराईत गुन्हेगार निखिल बाळू पगारे (२९, रा. दादाज्‌ अपार्टमेंट, विक्रीकर भवन, पाथर्डी फाटा), कुणाल उर्फ घार्या संभाजी घोडेराव (२२, रा. भगवती चौक, उत्तमनगर, सिडको) यांना अटक केली होती.

पगारे यानेच गेल्या नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर एमडीच्या पुडीसह व्हिडिओ व्हायरल केला होता. तेव्हापासून पोलीस संशयितांच्या मागावर होते. अखेर गेल्या आठवड्यात दोघांना गुन्हेशाखेच्या युनिट एकने अटक केली होती.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

दोघांना एमडी पुरविणाऱ्या संशयित अनंत सर्जेराव जायभावे (३०, रा. स्वामी समर्थनगर, आडगाव) यास अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. तपासादरम्यान त्याच्या घरझडती घेतली असता, २ लाख ७० हजारांची ५४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली आहे.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास हजर केले असता, न्यायालयाने येत्या २५ तारखेपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव हे करीत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

पुरवठा मुंबईतून:
अनंत जायभावे याच्याकडून संशयित निखिल पगारे, घाऱ्या हे एमडी खरेदी करून विक्री करीत होते. तर जायभावे याच्या चौकशीतून तो मुंबईतून एमडी खरेदी करीत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे मुंबईतील कोणत्या रॅकेटच्या संपर्कात जायभावे आहे, याचा पोलिस तपास करीत आहे. यापूर्वीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये वडाळागावातील छोट्या भाभीला मुंबईतूनच एमडीचा पुरवठा होत असल्याचे समोर आले होते.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here