मनपाची आज महासभा; विकास कामांसह विविध विषयांवर होणार चर्चा

नाशिक। दि. २० एप्रिल २०२६ : शहरातील पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर यापूर्वी दोनदा विशेष महासभा घेऊनही ठोस निष्पन्न न झाल्याने आजच्या महासभेत नगरसेवकांकडून प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. तसेच विविध प्रभागांतील ४० हून अधिक विकासकामांच्या प्रस्तावांवरही सविस्तर चर्चा होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वरमध्ये १६ वारसा संवर्धन प्रकल्पांना वेग

महापालिकेची महासभा सोमवारी (दि. २०) सकाळी ११.३० वाजता सभागृहात महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

या बैठकीत शहरातील नद्यांच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध प्रश्नांवर चर्चा होणार असून, प्रशासनाच्या कामकाजावरही तीव्र प्रश्न उपस्थित होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, पाथर्डी शिवारातील नागरी वस्तीचे ‘श्री शनैश्वर महाराज नगर’ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावरही महासभेत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790