नाशिक, २९ ऑगस्ट २०२६ : मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या ‘कुंभ भक्ती संगम’च्या दुसऱ्या दिवशी नाशिककरांसाठी कु. मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा विशेष कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
शनिवारी (२९ ऑगस्ट) रात्री ८ ते १० या वेळेत ठक्कर डोम येथे मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून, त्यापूर्वी दिवसभर ‘भक्ती संमेलन’च्या माध्यमातून भारतीय संतपरंपरा, समरसता आणि राष्ट्रीय स्तरावरील संतपरंपरेचा सहभाग व समन्वय यावर विचारमंथन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे.
नाशिककरांसाठी विनामूल्य कार्यक्रम:
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “पहिल्या दिवशी नाशिककरांनी ‘कुंभ भक्ती संगम’ला दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. उद्याचा दिवस विचारमंथन आणि भक्तिसंगीताने समृद्ध आहे. विशेषतः मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. नाशिककरांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे माझे आवाहन आहे.”
![]()


