नाशिकमध्ये आकांक्षा हाटचे 3 ते 5 सप्टेंबरपर्यंत आयोजन

नाशिक। दि. २८ ऑगस्ट २०२६: नाशिक शहरात नीती आयोगांतर्गत आकांक्षित तालुका कार्यक्रम तसेच जिल्हा परिषद नाशिक व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आकांक्षा हाट’ नाशिक पंचायत समिती आवार, बांधकाम भवनसमोर, त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक येथे ३ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य ग्रामीण जीवनान्नती अभियानचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ई-केवायसीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

ग्रामीण भागातील आदिवासी महिला व स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या उपक्रमात करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, विविध खाद्यपदार्थ तसेच ‘Eat Wisely’ या नावाने विकसित केलेल्या ब्रँडअंतर्गत ब्लॉक प्रिंटिंग केलेले कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

यामध्ये बेडशीट, पिलो कव्हर, कुर्ती, साडी आदी विविध वस्तूंचा समावेश आहे. या महोत्सवाला भेट देऊन ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790