नाशिक परिमंडळात ८४ कोटी रुपये थकबाकी; १२ हजार ४१४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक परिमंडळातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीच्या ४ लाख ८२ हजार ३३० ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ८३ कोटी ९९ लाख रुपये थकबाकी असुन, थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे नाशिक परिमंडलातील जानेवारी महिन्यात १२ हजार ४१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.  त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. 

नाशिक परिमंडलातील महावितरणच्या घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, सार्वजनिक सेवा व ईतर वर्गवारीच्या ४ लाख ८२ हजार ३३० ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ८३ कोटी ९९ लाख रुपये थकबाकी असुन यामध्ये नाशिक मंडळातील १ लाख ८२ हजार १२२ ग्राहकांकडे २७ कोटी ३० लाख रुपये, मालेगांव मंडळातील ५४ हजार ०९१ ग्राहकांकडे ७ कोटी ६७ लाख रुपये, अहिल्यानगर मंडळातील २ लाख ४६ हजार ११७ ग्राहकांकडे ४९ कोटी ०२ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामुळे नाशिक परिमंडलातील सर्वच विभागामध्ये वीज थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम जोरात सुरु आहे या अंतर्गत जानेवारी महिन्यात १२ हजार ४१४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्याबरोबरच थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश कार्यकारी संचालक (वितरण) दत्तात्रय पडळकर यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले त्यानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

यामध्ये नाशिक परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अधिकारी व अभियंते यांनी सुद्धा नाशिक शहरामध्ये थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम राबविली आहे.  दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे.

ग्राहकांना वेळेत वीजबिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग, वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास अवधी लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here