नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशभर वेगाने लसीकरण करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. त्याअंतर्गतच जिल्ह्यातही लसीकरणास वेग आला असून, आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात १७ लाख ४९८ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
लस घेतलेल्यांना दुसऱ्या लाटेत झालेला फायदा लक्षात घेता नागरिकांचा आता लस घेण्याकडे कल वाढला आहे. आता जिल्ह्यात १७ लाख ४९८ इतक्या नागरिकांनी लस घेतली. त्यातील १३ लाख २ हजार ३९७ जणांनी पहिला डोस घेतला तर ३ लाख ९८ हजार १०१ जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. जिल्ह्यातील ७२ लाख ८८ हजार ९९० जणांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट असून, ५५ लाख ८८ हजार ४९२ जणांचे लस घेणे बाकी आहे.
या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?