नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ३४० कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्ण पुर्णपणे बरे होण्याची टक्केवारी ५६.८८ इतकी आहे. सद्यस्थितीत १ हजार ५३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक जिल्हा रूग्णालय ७८ , नाशिक महानगरपालिका १००४, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय १०६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७६, नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. व सी.सी.सी. १९१, गृह विलगीकरण ८१ असे एकूण १ हजार ५३६ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.तसेच जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
मंगळवारी (दि. ३० जून २०२०) दाखल रुग्ण :
मंगळवारी जिल्ह्यात नव्याने नाशिक जिल्हा रूग्णालय १० , नाशिक महानगरपालिका १८२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ०७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्र १२, तर नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. , सी.सी.सी. ९८ व गृह विलगीकरण ०० असे एकूण ३०९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
नाशिक ग्रामीण मधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८.७० टक्के, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४४.७६, मालेगाव मनपा मधून ७९. ०५ टक्के व जिल्हा बाहेरील ६२.९० टक्के इतके असून संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.८८ टक्के इतकी आहे.
एकूण मृत्यू :
नाशिक ग्रामीण ४७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १०५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७५ व जिल्हा बाहेरील ११ अशा एकूण २३८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.