नाशिक: घरफोडी प्रकरणी आरोपी अटक; साडेचार लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. १५ फेब्रुवारी २०२६: पंचवटी परिसरातील वडजाईमाता नगर येथे घरात घुसून सोने चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने अटक करून त्याच्याकडून सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता ते २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडजाईमाता नगर परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्यानंतर गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने तपास सुरू केला. तपासादरम्यान हवालदार प्रशांत मरकड व अंमलदार मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीचे सोने विक्रीसाठी पंचवटी अमरधाम येथून सराफ बाजाराकडे येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, संदिप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, नाझीमखान पठाण, अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे व चालक समाधान पवार यांच्या पथकाने अमरधामहून गौरी पंटागणाकडे येणाऱ्या डांबरी रस्त्यावर सापळा रचला.

सापळ्यात सुमित अनिल राजुरे (वय २४, रा. वार्ड क्र. ७, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हा संशयित इसम ताब्यात घेण्यात आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

त्याच्या अंगझडतीत १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा कॉईन व २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण ३१ ग्रॅम वजनाचा अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790