नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले असून सिन्नर तालुक्यातील दातली येथील ६३ वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. दरम्यान, महापालिकेचा आरोग्य-वैद्यकीय विभागाने संशयित रुग्णांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत डेंग्यू नियंत्रणात आला असतानाच एप्रिल महिना स्वाईन फ्लूच्या साथीला निमंत्रण देणारा ठरला आहे. सध्या दिवसा कडक ऊन व रात्री थंड हवा असे विचित्र तापमान आहे. अशातच स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले असून त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
या दोन्ही रुग्णांचे अहवाल पुणे येथील राष्टीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीला पाठवले असता दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उपचारानंतर हे रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, सिन्नरमधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिलेचा शहरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ही महिला सर्दी व तापामुळे या महिलेला नाशिकरोड येथील एका रुग्णालयात उपचार घेत होती.