नाशिक: पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी 30 जून पर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी

नाशिक। दि. ३ जून २०२६: केंद्र व राज्य शासनाने चालू वर्षासाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण बंधनकारक केले असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

राज्यात २०२६ मध्ये विशेष ई-केवायसी मोहीम राबविण्यात येत असून, सर्व पात्र लाभार्थींनी मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी. यामुळे यामुळे योजनेतील पारदर्शकता वाढविणे, त्रुटी दूर करणे आणि लाभ प्रत्यक्ष पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे व आगामी हप्त्यांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या सामायिक सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे किंवा ‘पीएम किसान’ मोबाईल अॅपद्वारे स्वतःच्या चेहऱ्यावरील ओळख (Face Authentication) पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करावी.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

ज्येष्ठ नागरिक, आजारी अथवा केंद्रावर जाण्यास असमर्थ लाभार्थ्यांसाठी गावपातळीवरील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत केली जात असल्याचेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790