नाशिक: 11 व 13 फेब्रुवारी रोजी गोळीबार प्रात्यक्षिके; प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना जाण्यास सक्त मनाई

नाशिक (प्रतिनिधी): जनरल स्टाफ ऑफिसर, मुख्यालय तोफखाना, देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे नाशिक व इगतपुरी तालुक्यातील झेड सेक्टर या ठिकाणी  मंगळवार 11 फेब्रुवारी व गुरूवार 13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या कालावधीत गोळीबाराची प्रात्याक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव तऱ्हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, कवडदरा,  समनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदूर वैद्य, टाकेद बुद्रूक, धामणगाव, नांदगाव बुद्रुक, साकूर दुमाला, बेळगाव कुऱ्हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरवीर खुर्द, लहवित, अस्वली व  नाशिक तालुक्यातील वंजारवाडी या झेड सेक्टर मधील गावांच्या मुलकी हद्दीतील काही भाग तोफांच्या माऱ्याच्या रेषेत येतो. हा विशिष्ट भाग कोणता आहे याबाबत संबंधित गावांना दवंडीद्वारे सूचित करण्यात आले आहे.त्यामुळे गोळीबार प्रात्याक्षिकाच्या दिवशी  व त्या वेळी धोक्याच्या हद्दीत नागरिकांना प्रवेश करण्यास व या भागात जानावरे पाठविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही. सदर सूचनेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अपर जिल्हादंडाधिकारी वाघ यांनी कळविले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here