Amazon

नाशिक: आदिवासी उमेदवारांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी 28 नोव्हेंबरला मुलाखतीचे आयोजन

नाशिक (प्रतिनिधी): शिपाई, लिपिक, ग्रामसेवक, तलाठी या वर्ग 3 व 4 पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी आदिवासी उमेदवारांची पूर्वतयारी करून घेण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, कळवण येथे साडेतीन महिन्यांच्या कालावधीचे प्रशिक्षण 1 डिसेंबर, 2024 पासून सुरू होणार आहे.

इच्छुकांनी 28 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी  9.30 वाजता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जुने तहसील कार्यालय आवार, नेहरू चौक, कळवण, जिल्हा नाशिक येथे मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रविकुमार पंतम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

साडेतीन महिने कालावधीचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 1  डिसेंबर 2024 पासून सुरू होणार असून प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रुपये 1 हजार  विद्यावेतन देय असणार आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावी. उमेदवाराने मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र,  राष्ट्रीयीकृत बँकेच्या स्वतःच्या नावे असलेल्या खाते पुस्तकाच्या छायांकित प्रतीसह एक पासपोर्ट साईज छायाचित्र सोबत आणावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; २५ हजारांचा दंड

मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना निवास व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. तसेच उमेदवारांना मुलाखतीस जाण्याचा प्रवास खर्च दिला जाणार नाही. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी अर्ज करू नयेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02592-299973 किंवा मोबाईल क्रमांक 8888717338 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790