नाशिक शहर कार्यक्षेत्रात 8 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

नाशिक। दि. २४ नोव्हेंबर २०२६: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 25 नोव्हेंबर 2026 रोजी मध्य रात्रीपासून ते 8 ि डसेंबर 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये थंडीचा जोर ओसरला; आज (दि. २४) किमान तापमानाचा पारा १६.७ अंशांवर

सदरचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, चित्रपटगृह आदींसाठी लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. चव्हाण यांनी आदेशात नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790