Amazon

नाशिक: आयुक्त कार्यालय येथे विभागीय लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

नाशिक (प्रतिनिधी): येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक 13 जानेवारी, 2025 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल उपायुक्त अरुण आनंदकर यांनी दिली आहे.

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

दरम्यान, याच वेळेस विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेद्वारे सोडवणूक करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुकास्तर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केलेले असतील व त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह त्यांचे अर्ज दिनांक 13 जानेवारी रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सकाळी 11 वाजता सादर करावेत, असे आवाहन विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, नाशिक यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790