नाशिक (प्रतिनिधी): सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक यांच्या अधिपत्याखाली अशासकीय लिपिक टंकलेखक उमेदवार अटी व शर्थीवर पद भरावयाचे आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल विलास सोनवणे (नि.) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
पात्रता अटी अशा: उमेदवार हा भारतीय सशस्त्र दलात १५ वर्षांपेक्षा कमी सेवा केलेली नसावा, वरील प्रमाणे उमेदवार न मिळाल्यास युद्ध विधवा, युद्धजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सैनिकाची विधवा पत्नी या पदासाठी पात्र असतील. मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास ३० शब्द, तर इंग्रजी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास ४० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असावे. तसेच महाराष्ट्र शासनाचे एमएस सीआयटी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
वेतन दरमहा ३८४६०.४३ रुपये एवढे राहील.
जिल्ह्यातील इच्छुक व पात्र माजी सैनिक, वीरपत्नी, माजी सैनिक पत्नी यांनी आपले अर्ज ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

