नाशिक। दि. २२ नोव्हेंबर २०२५: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, के.बी.एच. डेंटल कॉलेज व हॉस्पिटल आणि एम.जी.व्हि.एस पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता एम.जी.व्हि.एस पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स येथे केले आहे.
जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या मेळाव्यात नामांकित कंपन्या/ नियोक्ते नियोजित स्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.
भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर ऑप्शनवर क्लिक करून रिक्तपदे अधिसूचित करावी. याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.
![]()


