नाशिक: कादवा काठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा

बाणगंगेला देखील आला हंगामातला पहिला पूर

निफाड। दीपक श्रीवास्तव, दि. १९ जून २०२५: निफाड सह दिंडोरी, वणी, सुरगाणा परिसरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येण्यास सुरुवात झाली आहे. निफाड तालुक्यातून वाहणाऱ्या कादवा आणि बाणगंगा या दोन्ही प्रमुख नद्या व उपनद्यांना पाणी वाढू लागले असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. उपविभागीय अधिकारी, पालखेड पाटबंधारे उपविभाग, पिंपळगाव (ब) यांनी याबाबत नागरिकांसाठी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा जारी केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

त्यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार बुधवार सायंकाळ पासून पालखेड धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील धामण व कोलवण नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहे. पालखेड धरण परीचालन सुची नुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे धरणांमधील पाण्याची होणारी वाढती आवक लक्षात घेता जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये विसर्ग प्रवाहित करण्याची शक्यता आहे. तसेच पुढील कालावधीत धरणा मधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्यामूळे कादवा नदीकाठच्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की नदी पात्रात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे हे सुचित करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

दरम्यान ओझर सुकेणे परिसरातून वाहणाऱ्या बाणगंगा या नदीला देखील आला असून नदी भरून वाहत आहे. बानगंगेला आलेल्या या पुरामुळे ओझर ते सुकेने दरम्यान नदीपात्रामध्ये बांधण्यात आलेले साठवण बंधारे ओव्हर फ्लो झालेअसल्याने ओसंडून वाहू लागले आहेत , नदीकाठच्या दोन गावांना जोडणाऱ्या फरशी पुलांवर देखील चार ते पाच फूट पाणी असल्यामुळे ग्रामीण दळणवळण व्यवस्था प्रभावित झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून संततधार पावसाला सुरूवात झाली असून आज गुरुवारी पावसाचा जोर कायम होता, दरम्यान दिंडोरी व रामशेज या बाणगंगाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या सुमारास जोरदार संततदार पाऊस झाल्याने बाणगंगा नदीला येऊन मिळणारे सर्व ओढे-नाले हे तुडुंब भरून वाहत असल्याने बानगंगा नदीला आज पहाटे मोठा पूर आला, यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिला पूर पाण्यासाठी बाणगंगा काठच्या गावांमध्ये गर्दी होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790