Amazon

नाशिक: टपाल विभागातर्फे 9 ऑक्टोबर रोजी पेन्शन अदालतचे आयोजन

नाशिक। दि. ९ ऑक्टोबर २०२६: टपाल विभागाच्या पेन्शन, परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींसाठी प्रवर अधिक्षक डाक घर, नाशिक विभाग, नाशिक यांच्याद्वारे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक, डाकघर, नाशिक विभाग, नाशिक यांचे कार्यालय जी.पी.ओ. कंपाऊंड, नाशिक येथे पेन्शन अदालत होणार आहे. असे प्रवर अधीक्षक, डाकघर, नाशिक विभाग, नाशिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 10 व 11 ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

पेन्शन अदालतमध्ये पुर्णपणे कायदेशीर मुद्दयांसह प्रकरणे इ. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी, एमएसिपी, पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आदी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790