नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

नाशिक। दि. ८ जून २०२६: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेच्या (CDS) पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे तासिका तत्वावर तज्ज्ञ प्राध्यापकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

या केंद्रात वर्षातून दोन वेळेस ७५ दिवसांचे सीडीएस प्रशिक्षण देण्यात येते. त्याला १५ जून २०२६ पासून सुरुवात होत आहे. इच्छुक उमेदवारांनी pctcoic@yahoo.in या ई मेल आयडीवर अर्ज करावेत. त्यासाठी सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. इच्छुकांना दोन वर्षांचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा अनुभव आवश्यक आहे. निवड झालेल्या प्राध्यापकांना प्रति तास एक हजार रुपये मानधन देण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

१) इंग्रजी, २) गणित, ३) सामान्य विज्ञान- १, सामान्यज्ञान, भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण, ४) सामान्य विज्ञान- २, अर्थशास्त्र, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र असे एकूण चार पैकी एक संवर्गाचा स्पष्ट उल्लेख अर्जात करावा. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी १२ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, नाशिक येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९१५६०- ७३३०६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790