Amazon

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाणा, कळवण आणि पेठ तालुक्यांत जाणवली कंपने, कोणतीही हानी नाही

नाशिक। दि. ०६ ऑगस्ट २०२६: नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) दुपारी सुरगाणा, कळवण आणि पेठ तालुक्यांतील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३.४० वाजता सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच कळवण तालुक्यातील दळवट परिसरात दुपारी ३.३८ वाजता, तर पेठ तालुक्यातील आसरबारी परिसरातही त्याच सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांना जाणवला.

प्राथमिक अहवालानुसार, तिन्ही तालुक्यांत कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. प्रशासनाकडून संबंधित परिसरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती माहिती संकलित केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढासह देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी

दरम्यान, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS), नवी दिल्ली येथील पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, भूकंपाच्या घटनेची पाहणी व पुढील तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790