नाशिक: पत्नीच्या खुनप्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (दीपक श्रीवास्तव): कौटुंबिक कारणावरुन पत्नीसोबत वाद घालुन तिची झोपेतच कुऱ्हाड हत्या केल्याच्या आरोपात श्रावण किसन गायकवाड ( वय ३७) रा रौळस ता निफाड यास दोषी ठरवत निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए व्ही गुजराथी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

निफाड तालुक्यातील रौळस येथे श्रावण किसन गायकवाड पत्नी सिमा श्रावण गायकवाड दोन मुले हर्षद (१० वर्ष) व जयेश (७ वर्ष) असे कुटुंब होते श्रावण यास दारु पिण्याचे व्यसन होते ३० मार्च २०१९ रोजी रात्री ११ ते २ च्या दरम्यान सिमा हिचेसोबत पती श्रावण याने घरगुती कारणावरुन वाद केला त्याच रात्री पत्नी सिमा झोपल्यावर डोक्यात घरातील कुऱ्हाड मारुन खुन केला व तिथून पलायन केले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

याबाबत मयत सिमा हिचे बंधु भारत गायकवाड यांनी निफाड पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली. त्यानुसार भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवुन  श्रावण किसन गायकवाड यास अटक केली. तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड यांनी तपास करुन आरोपपत्र निफाड न्यायालयात दाखल केले.

सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल ऍड. रमेश कापसे यांनी तपास अधिकारी यांचेसह एकुण ९ महत्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष नोंदविली व युक्तिवाद केला. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन आरोपी श्रावण किसन गायकवाड यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास दहा वर्ष कारावास अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए व्हि गुजराथी यांनी सुनावली आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790