नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्याची लोकसंख्या ही सुमारे 62 लाख एवढी आहे. 62 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ 341 कोविड रुग्ण उपचार घेत असुन त्यातील 16 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. तसेच केवळ 3 रुग्ण अतिदक्षता विभागात आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना ह्या ठरल्या आहेत, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
त्यामुळे लॉकडाउन शिथील करण्याच्या दिशेने शासनाने निर्णय घेतला आहे. कोरोना आजाराबाबत आता सकारात्मक विचार करुन त्याचे आजपर्यंतच्या रुग्णांची गणना करण्यापेक्षा खरोखरच आज किती रुग्ण उपचार घेत आहेत, पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले किती आहेत हे ही समाजासमोर आणण्याची जबाबदारी शासन, प्रशासन , नागरिक आणि माध्यमांचीही आहे. त्यासाठी सर्वांना ताकदीने कोरोनामुक्तीसाठी काम सुरु ठेवावे लागणार आहे. ज्या दिवशी शाळा व महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय होईल त्यादिवशी आपण जिंकलो आणि कोरोना हरला असे चित्र आपण येणाऱ्या काळात पाहू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.