नाशिक: भावली धरणाकडे पर्यटनासाठी आलेल्या २ वाहनांचा अपघात; ४ जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर पर्यटनासाठी आलेल्या दोन गाड्यांचा समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात भगतवाडीजवळ रविवार (दि. २८ रोजी ) अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील चार ते पाच पर्यटक जखमी झाले आहेत.

शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात मुंबई, नाशिक, पुणे येथुन पर्यटक भावली धरण परिसरात आले होते.

भावली धरण परीसरातील भगतवाडीजवळ परतीच्या प्रवासासाठी जात असतांना समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात या दोन्ही गाडीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही गाड्या रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या पुलावरून खाली कोसळल्या.

या गाड्यांमधील चार ते पाच जण जखमी झाले असुन अद्याप त्यांची नावे समजली नाही. अपघाताची माहिती समजताच इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस निरिक्षक राहूल तसरे व पोलीस पथकांनी जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790