Amazon

नाशिक: शेअर बाजारातील भरघोस परताव्याचे आमिष; नाशिककराला ७५ लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक। दि. ८ ऑक्टोबर २०२६: शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी मखमलाबाद नाका परिसरातील एका नागरिकाची तब्बल ७५ लाख ९ हजार ६६२ रुपयांची फसवणूक केली. ‘वेल्थ डिस्कशन २३’ या ग्रुपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी शहर सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  अंबड दुषित पाणी प्रकरण: प्रदुषण नियंत्रणाचे नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

पोलिसांच्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२५ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत संशयितांनी तब्बल सहा वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून संबंधित नागरिकाशी संपर्क साधला. स्वतःची शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणून ओळख करून देत त्यांनी गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

संशयितांच्या आमिषाला बळी पडून नागरिकाने त्यांच्या सांगण्यानुसार टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवली. मात्र, ७५ लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक करूनही प्रत्यक्षात कोणताही परतावा मिळाला नाही. त्यानंतर संपर्क साधण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाइल क्रमांकही अचानक बंद झाले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे नागरिकाच्या लक्षात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’मार्फत निःशुल्क ॲग्रीकल्चर ड्रोन प्रशिक्षण

यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती तपासण्याचे काम सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790