नाशिक: कर्जाची परतफेड करूनही १६ लाखांचे दागिने मिळाले नाही; संचालकांविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): कर्जाची परतफेड करूनही दागिने न मिळाल्याने चिरायू नागरी सह.पतसंस्थेच्या दोन पदाधिका-यांविरुध्द कर्जदाराच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी दिपक रावसाहेब पठारे (रा. उल्हासनगर, ठाणे) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. नंतर तो गुन्हा म्हसरुळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

सोने तारण गहाण कर्जातील अलंकाराचा पतसंस्था प्रशासनाने परस्पर विल्हेवाट लावल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

याप्रकरणी पठारे यांनी तक्रार दाखल केली. पठारे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मखमलाबादरोडवरील जाधव कॉलनीत असलेल्या संशयितांच्या चिरायू नागरी सह.पतसंस्थेतून सोने तारण गहाण कर्ज घेतले होते. या पोटी सुमारे १६ लाख २ हजार ५५ रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने पतसंस्थेत गहाण ठेवले होते.

त्यानंतर त्यांनी कर्जाची परतफेड केली असता अपहाराचा हा प्रकार समोर आला. संशयित व्यवस्थापक व अध्यक्षांनी संगनमत करून दागिण्यांचा परस्पर अपहार केला.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

मुदतीत कर्जाची परतफेड करूनही दागिने परत न मिळाल्याने पठारे यांनी पतसंस्थेच्या शाखेत विचारणा केली असता अपहार व फसवणुक झाल्याचे समोर आले. पठारे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास म्हसरूळ पोलिस करीत आहेत. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४२५/२०२३) भारतीय दंड विधान ४२०, ४०६, ४०३, ४१७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपीक कॅपिटल इंडिया यांनी कर्जदार यांचे कर्ज टेक ओव्हर करताना आमच्याशी कुठलाही प्रकारचा पत्रव्यवहार न करता परस्पर कर्ज दिलेली आहे.
तसेच कर्जदार यांचे सोने माननीय न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्यात आले असून फिर्यादी यांनी न्यायालयाची दिशाभूल करून व सत्य परिस्थिती लपून गुन्हा दाखल करायचा आदेश प्राप्त केला आहे.
या संदर्भात संस्था कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करीत आहे. डॉ. राहुल जैन-बागमार, अध्यक्ष : चिरायू पतसंस्था

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790