अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी पतीसह दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांवर गुन्हा

नाशिक, दि. १३ फेब्रुवारी २०२६: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पतीविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलीचे वडील, काका, मामा-मामी, मावशी तसेच सासू-सासरे यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील एका मंगल कार्यालयात संबंधित मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मुलगी अठरा वर्षांखालील असल्याची माहिती असतानाही कुटुंबीयांनी हा विवाह लावून दिल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, विवाहानंतर पतीने अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे त्याच्यावर बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच विवाहास संमती देणाऱ्या आणि सोहळा पार पाडण्यात सहभागी झालेल्या नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत असून, संबंधित सर्व संशयितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790