
नाशिक (प्रतिनिधी): दीड किलो सोन्याचा अपहार करत फरार झालेल्या सराफ व्यावसायिकास अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने पुणे येथे सहकारनगर भागात ही कारवाई केली.
सतीश बेदमुथा असे या संशयित सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयित एक महिन्यापासून फरार होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कांतिलाल सुगनचंद सराफ या दुकानाचा मालक संशयित बेदमुथा हा आहे. हा जुना सराफ व्यावसायिक असून सोने तारण ठेवल्यास ८ टक्के व्याजाने पैसे देण्याचे त्याने गुंतवणूकदारांना आमिष दाखवले होते. तक्रारदार आणि त्याच्या आईने १५५७.२९० ग्रॅम सोने तारण ठेवले होते. संशयिताने सुरुवातीला व्याज दिले. मात्र, नंतर व्याज देणे बंद केले.
सोने परत मागितले असता ते देण्यास नकार दिला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित फरार झाला होता. तो पुणे येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, संदीप भांड, विशाल काठे यांच्या पथकाने पुणे येथे माग काढत त्याला अटक केली. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ७२/२०२५)
![]()


