नाशिक, २१ नोव्हेंबर २०२५: शहरातील तापमानात थोडी वाढ जाणवत असली तरी थंडीचा जोर अद्याप कमी झालेला नाही. गुरुवारी सकाळी किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
या वर्षी नोव्हेंबरच्या उत्तरार्धात नाशिकमध्ये लक्षणीय गारठा जाणवत आहे. २ नोव्हेंबरला किमान तापमान २०.७ अंश सेल्सिअस नोंदविल्यानंतर पुढील दिवशी ते सुमारे २ अंशांनी वाढले होते. मात्र, ४ नोव्हेंबरपासून तापमान सातत्याने घसरत गेले आणि १६ नोव्हेंबरला हंगामातील सर्वात कमी म्हणजे १०.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात थोडी वाढ दिसत असली तरी कमाल तापमान घटल्याने दिवसाही गारवा जाणवत आहे. या आरोग्यस्नेही वातावरणाचा आनंद घेण्यासाठी शहरातील जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
