नाशिकमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; आणखी दोन दिवस कोरड्या वातावरणाची शक्यता

नाशिक। दि. १७ जुलै २०२६: राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली असली, तरी नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाने अद्याप अपेक्षित जोर धरलेला नाही. १ जून ते १५ जुलै या कालावधीतील पावसाच्या आकडेवारीनुसार राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पावसाने हजेरी लावलेली नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ६८.८ टक्के पाऊस; येवला-नांदगावात पावसाची तूट

गुरुवारीही शहरात दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू राहिला. यापूर्वी झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी जुलैअखेरपर्यंत अपेक्षित असलेला साठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे शहरात लागू असलेली पाणी कपात सध्या कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका जुलैअखेर धरणसाठ्याचा आढावा घेणार असून, त्यानंतर पाणी कपात रद्द करायची की आणखी वाढवायची, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील भंडारदरा धरणातील पाणीसाठाही अद्याप समाधानकारक नसल्याने तेथील पाणीटंचाईची शक्यता कायम आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अनैतिक संबंधात अडधळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने केली हत्या; मृतदेह कसारा घाटात फेकला

१९ जुलैनंतर पावसाची शक्यता

हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, राज्यात १० ते १९ जुलैदरम्यान मान्सून काहीसा कमकुवत राहण्याची शक्यता आहे. १६ जुलैपर्यंत नाशिक जिल्ह्यातही पावसाने ओढ दिली असून, १९ जुलैनंतर नाशिकसह राज्यातील काही भागांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790