महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद

महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद

नाशिक (प्रतिनिधी): मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. की वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. हे सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करण्याकरीता विज वितरण कंपनीमार्फत शनिवार (दि. २०) तेथील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही. तसेच मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो.

सदरचे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा शनिवारी (दि. २०) बंद ठेवून दोन्ही ठिकाणची दुरुस्ती केली जाणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्यामुळे संपूर्ण शहरास होणारा पाणीपुरवठा शनिवार (दि. २०) होणार नाही. तसेच रविवारी (दि.२१) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मनपाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) शिवाजी चव्हाणके यांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790