महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी हाती घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शतपावली करतांना पाय घसरून नाल्यात पडल्याने तरुणीचा मृत्यू...

त्यामुळे शनिवार दि. 25 मे रोजी सकाळी 9 वाजेपासुन पुर्ण दिवस व रविवार दि. 26 मे रोजी सकाळचा संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही, याची नागरीकांनी नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790