अजून दोन दिवस बदल राहण्याची शक्यता…
नाशिक (प्रतिनिधी): अशोकस्तंभ ते सीबीएस रस्त्यावर गेल्या चार दिवसांपासून शेतकरी, कष्टकऱ्यांनी ठिय्या मांडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने आता या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बदलण्यात आली आहे.
हा मार्ग पूर्णतः बंद: अशोकस्तंभ ते मेहेर सिग्नल, सीबीएस सिग्नल ते मोडक सिग्नल हा मार्ग दोन्ही बाजूने रहदारीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असे:
📌 सारडा सर्कल ते शालीमारकडे येणारी वाहतूक खडकाळी सिग्नलमार्गे मोडक सिग्नल, जलतरण तलाव सिग्नलमार्गे इतरत्र जाईल. मोडक सिग्नलकडून येणारी वाहतूक सीबीएस सिग्नल येथे डार्वाकडे वळून टिळकवाडी सिग्नलकडे व इतरत्र जाईल.
📌 गंगापूररोडने रविवार कारंजाकडे व पंचवटीकडे जाणारी वाहतूक जनावरांच्या दवाखाना ते घारपुरे घाटाने रामवाडी ब्रीजवरून पंचवटीकडे व इतरत्र जाईल.
📌 पंचवटीकडून रविवार कारंजाकडे व पंचवटीकडे जाणारी वाहतूक मालेगाव स्टॅण्ड येथून मखमलाबादनाका, बायजाबाई छावणी, रामवाडी, चोपडा लॉन्समार्गे पुढे इतरत्र जाईल.
📌 कॅनडा कॉर्नरकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक राणे डेअरी, मॅरेथॉन चौकमार्गे टिळकवाडी, रामायण बंगला, जलतरण तलाव सिग्नलमार्गे इतरत्र जाईल.