नाशिक (प्रतिनिधी): श्रीराम रथ व श्री गरुड रथोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. ८) श्री काळाराम मंदिर ते मिरवणूक मार्गावर दुपारी २ ते मिरवणूक संपेपर्यंत वाहनांना प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्गाने वाहतूक जाईल.
श्रीराम रथ मार्ग : काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, नागचौक, चरण पादुका चौक, लक्ष्मण झुला पुल, काट्या मारुती, गणेशवाडी, आयुर्वेदीक महाविद्यालय, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, कपालेश्वर मंदिर, रामकुंड, परशुराम पुरीया रोडने मालविया चौक, शनी चौक, हनुमान चौक, आखाडा तालीम, काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा.
गरुड रथ मार्ग : गरुड रथ श्रीराम रथ मार्गावर सोबतच निघतो. हा रथ पुढे रोकडोबा हनुमान मंदीर, गाडगे महाराज पुलाखालून दिल्ली दरवाजा, नेहरु चौक, धुमाळ पॉइंट, मेनरोडने बोहरपट्टी, सराफ बाजार, रामसेतू पुलाच्या पश्चिम बाजूने कपुरथळा मैदान, म्हसोबा पटांगण येथून रामरथासोबत काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे जातो.
पर्यायी मार्ग : काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडी, मार्गे मेनरोडकडे जाणारी वाहतूक काट्या मारुती, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजाकडून इतरत्र जाईल.