नाशिक (प्रतिनिधी): हनुमान जन्मोत्सव मिरवणूक निमित्त शनिवारी (दि. १२) वझरे मारुती मंदिर, दूध बाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, एमजीरोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, रामकुंड पंचवटी या मार्गावर दुपारी ३ ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूकीस दोन्ही बाजूने प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग : बागवानपुरा पोलिस चौकी ते अमरधाम रोड, पंचवटीकडे जातील व येतील, सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, शालिमार, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूरनाकामार्गे पंचवटीकडे जातील-येतील. सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारी वाहतूक वाहतूक मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, जनावरांचा दवाखाना, घारपुरे घाट, रामवाडी पुलामार्गे जातील-येतील. या मार्गावर वाहतूक ही परिस्थितीनुसार बंद केली जाऊन पुन्हा सुरू केली जाणार आहे. वाहनचालकांनी कोंडी टाळण्याकरिता इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे