नाशिक। दि. २२ फेब्रुवारी २०२६: देवळालीत श्री म्हसोबा महाराज यात्रा सोमवार (दि. २३) पासून आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमादरम्यान अनुराधा चौकापासून राजवाड्यापर्यंत गर्दी होणार असल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.
वाहतूक बदल असा:
२३ फेब्रुवारी : सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सत्कार पाँईट ते राजवाडा चौकापर्यंत एकेरी वाहतुक रहाणार आहे.
२३ ते २५ फेब्रुवारी : रोज सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजपेर्यंत सत्कार पाँईट ते राजवाडा चौकापर्यत वाहतुक बंद रहाणार आहे.
पर्यायी मार्ग: नाशिकरोड ते देवळाली कॅम्प या मार्गावरील जाणारे येणारे वाहने ही नाशिकरोड कोर्टाकडून अनुराधा चौक, जैनभवन, आर्टीलरी सेंटर चौक, रोकडोबावाडी, हांडोरे चौकमार्गे विहीतगाव मार्गे जातील. तर देवळाली कॅम्प व विहीतगावाकडून येणारी वाहने ही राजवाडा चौकापासून तक्षशिला विद्यालय, मालधक्कारोड, रेल्वे स्टेशनकडून मार्ग रहाणार आहे.
![]()

